वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(गौळणींची अवस्था)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079753 · अभंग क्र. ३७८३

3783.
(गौळणींची अवस्था)
मिळोनि गौळणी देती यशोदे गाऱ्हाणी । दहि दुध तुप लोणी शिंकी नुरेचि काही ।
मेळवुनी पोरे तेथे रिघे एकसरे । वेगी आणोनी सामोरे तेथे लोणी खाय ॥१॥
हरी सोंकला वो सोंकला वो सोंकला तो । वारी तुज लाज नाही तरी ।
आम्हा सांपडता उरी तुज मज नाही ॥धृपद॥
तुज वाटतसे कोड यासि लागतसे गोड । काय हासतेसी वेड तुज लागले वो ।
आम्ही जाऊ तुजवरी पोरे चाळविल्या पोरी । काय सांगो भांडखोरी लाज वाटे आम्हा ॥२॥
मुख मळिण वदन उभा हाडतिये घोणे । तव दसवंती म्हणे आणा शीक लावू ।
थोर आणिला कांटाळा घरी दारी लोकपाळा । डेरा रिघोनी घुसळा तेथे लोणी खाय ॥३॥
मिळोनिया सकळा दावे लावूनिया गळा । कैशा बांधिती उखळा येथे राहे उगा ।
बरा सापडलासी हरी आजिच्याने करिसिल चोरी । डोळे घालुनिया येरी येरीकडे हासे ॥४॥
फांकल्या सकळा उपडूनिया उखळा । मोडी वृक्ष विमळादुर्जन दोन्ही ।
उठिला गजर दसवंती नव्हे धीर । धावे तुकयाचा दातार आळंगिला वेगी ॥५॥

अर्थ :
सर्व गवळणी यशोदेला गाऱ्हाणे देऊ लागले की हे यशोदे आता आमच्या शिंक्यामध्ये दही, दूध, लोणी काहीच उरत नाही. तुझा कान्हा आणि सर्व पोरे मिळून आमच्या शिंकेतील दही, दूध, तूप, लोणी जे काही असेल ते सर्व घेऊन त्वरेने येथून निघून जातात आणि त्वरेने ते सर्व खाऊन टाकतात. यशोदे तू तुझ्या हरीला काहीतरी शिकव तो फारच सोकला आहे तू जर काही शिकवले नाही तर आम्ही समजू की तुलाही आता लाज राहिली नाही. जर का तो हरी आमच्या हाती सापडला तर आम्ही तुझे काहीही चालू देणार नाहीत. पुढे त्या गवळणी म्हणू लागल्या हे यशोदे तुला तुझ्या पोराचे कोड कौतुक वाटते

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग