(गौळणींची अवस्था)
3787.
(गौळणींची अवस्था)
होते बहुत दिवस मानसी । आजि नवस हे फळले नवसी ।
व्हावी भेटी ते झाली गोविंदासी । आता सेवा करीन निश्चयेसी वो ॥१॥
स्थिर स्थिर मजसी साहे करा । बहु कष्ट सोसिल्या येरझारा ।
येथे आड मज न साहावे वारा । देऊनि कपाट आले ते दुसरे वारा वो ॥धृपद॥
मूळ सत्ता हे सायासाची जोडी । नेदी वेगळे होऊ एकी घडी ।
नाही लौकिक स्मरला आवडी । आता येणे काळे या वो लोभे वेडी वो ॥२॥
उदयी उदयो साधिला अवकाश । निश्चिंतीने निश्चिंती सावकाश ।
धरिये गोडी बहुत आला रस । तुका म्हणे हा मागुता न ये दिवस वो ॥३॥
अर्थ :
गोविंदाची व माझी भेट व्हावी हे खूप दिवसापासून माझ्या मनात होते व तसा मी नवसही केला होता तो नवस आज फळाला आला आहे. आता गोविंदाची व माझी भेट झाली मी निश्चयाने यापुढे गोविंदाची सेवा करीन. आता मला माझ्या कार्यामध्ये तुम्ही सहकार्य करा मला स्थिर करा मी आतापर्यंत जन्ममरणाच्या खूप येरझारा सोसल्या आहेत. आता गोविंदाची व माझी भेट झाली आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा आडवेपणा आलेला मला सहन होणार नाही मी सर्व प्रकारचे दार बंद करुन आलेले आहे जरी काही मधे प्रतिबंध आला तर तुम्ही त्याचे निवारण करा. स्वस्वरुपाची प्राप्ती मला खूप कष्टाने झाली आहे तसे पाहिले तर स्वस्वरुपही माझी मूळचीच सत्ता आहे परंतू आता मला ती सायासाने प्राप्त झाली आहे आता मी त्याला माझ्यापासून एक क्षणभर देखील वेगळे होऊ देणार नाही. स्वस्वरुप प्राप्त करुण घेताना मला कोणताही लोक लौकिक आडवा आला नाही किंवा मी त्याची आठवण केली नाही आता यावेळी मला स्वस्वरुपाची प्राप्ती झाली आहे ती माझ्या आवडीने आणि तिच्
