वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 172. कोल्हाटीण ३७५१ ते ३७५२

सगुण गुण माया । आली

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-090467 · अभंग क्र. ३७५२

3752.
सगुण गुण माया । आली कोल्हाटीणखेळाया ॥धृ.॥ प्रपंचाचा रोविला वेळु । चहूंशून्यांचा मांडिला खेळु । ब्रह्माविष्णु जयाचे बाळुलागती पाया ॥१॥ आला गडे निर्गुणांचा कोल्हाटी । सोहं शब्दे ढोलगें पिटी । चैतन्याची उघडून दृष्टी । चला जाऊ पाहाया ॥२॥ कोल्हाटीण मारितीऐशी उडी । एकवीस स्वर्गावरती माडी । देखे द्वारखिडकी उघडी । अगाध माया ॥३॥ कोल्हाटीणबसली असे डोळा । जाणे गुरुपुत्र विरळा । एकाजनार्दनीं लीळा । जाती वर्णाया ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग