सासुरवास ३७७१ ते ३७७
3771.
सासुरवास ३७७१ ते ३७७२
विषयांचे सासुरें दुश्चित बोळवण । प्रांतीचे पांघरूण बुंथी मज ॥१॥ अविवेक अंबुलाअहंकार सासुरा । अविद्येच्या घरामाजी नेलें ॥२॥ तेथे कल्पना हे सासु सदा सासुरवासु । घेऊ नेदीउमस आठवण ॥३॥ आठवणे सवे आठवणआठवत । तेणे पै फुटत हृदय माझे ॥४॥ कामक्रोधदेख भावे आणि दीर । मज आटिताती थोरस्वभाव त्यांचे ॥५॥ मोह म्हातारा सदा द्वारी । असे । धडासी वो पिसे लावितसे ॥६॥ वरीवरीसाबडा पोटींच पै कुडा । दंभ घाली खोडाप्रलोभाचा ॥७॥ इच्छा आणि निंदा सासुरे दासटे । ते मज चिमटे घेपिताती ॥८॥ ममता वोहिणीनंदुला चिंता । ती भेणे एकांता मज ठाव नाही ॥९॥ कामाहातीं मज नाही हो उगडु । निष्कामासी दंडुक्रोध करी ॥१०॥ द्वेषाची जाचणी सदा पैंखोचणी । कोणे घरी पापिणी बोळविलें ॥११॥ माझा भोळा भावो त्यासी नाही ठावो । त्यापाठींसंदेहो श्वान लागे ॥१२॥ त्या भेणे पळालामागुता नाही आला । देशधडी जाला भावोमाझा ॥१३॥ सखी माझी भक्ति भावासवें जाती । कोणा काकुळती येऊ माये ॥१४॥ आर्तीचेनिढळी ठेउनी बाहुली । पहातसे वाटुली माहेराची ॥१५॥ माहेराचे वाटे कोणी न भेटे । मावलीये पैठेकोण करी ॥१६॥ अक्रुरा प्रल्हादा धांव रे उद्धवा । माझ्यासाठी धांवा तुम्ही करा ॥१७॥ नारदामाझ्या धाव रे लवलाही । लागेन तुझ्या पायींजीवेंभावें ॥१८॥ सत्वर हनुमंता उडी घालीं आता॥मजलागीं सर्वथा मूळ यावो ॥१९॥ पृथु चक्रवर्तीजिवलग सांगाती । तुम्ही या निश्चिती मजमूळ ॥२०॥ पैल पुंडलीकाजवळी बापमाया । हर्षेनांदताहे भीमातीरी ॥२१॥ तेथीचे वारकरी त्याचेपाय धरी । नेउनी घाला माहेरी पंढरीसी ॥२२॥ एका जनार्दनी सासुरचि केले । तेंचि माहेर झालेंगुरुकृपें॥२३॥
