वरल्या आळीच्यांनो सा
3782.
वरल्या आळीच्यांनो सावध ऐका । गांवहापांचांचा यासी भुलू नका । पिंगळा बोलता बोला । तुम्ही सांडा गलबला ॥१॥ डुग डुग डुग दादा । डुग डुग डुग दादा ॥धृ.॥ चिलबिल चिलबिल । बोली बोलतो बोल । अर्थ पहाता दिसे सखोल । ब्रह्मा विष्णु महेश भुलले सकळ ॥२॥ चिल्यापिल्याच्या भारा । हाचि सांडा पसारा । गुंतलेयाची हावाधरूनी विचारा । तुलमिल तुलमिल करतीनारी आणि नर ॥३॥ विचक्षण तोचि जाणे येथीलअर्थ । येरा न कळे आपआपुला स्वार्थ । शरण एकाजनार्दनीं न सांडी हा पंथ । तुटेल खुंटेल अवघेजाहलें एक येथ ॥४॥
