सहा दादुले केले परि
3763.
सहा दादुले केले परि म्या ऐसा नाहींदेखिला दादुला । काया वाचा रमलेंत्याशीं परी म्यांऐसा नाही देखिला दादुला ॥१॥ सौरी झाले सौरीसखे बाई झाले त्याची नवरी ॥धृ.॥ नग्न होऊनीभोगिला पुरुषम्यां ऐसा नाही देखिला दादुला । देतोगोड गोड खाया परीम्या ऐसा नाही देखिला दादुला॥श केला संसार गोड परीम्या ऐसा नाही देखिलादादुला । याचे मनाची पुरविली खोड परींम्यां ऐसानाहीं देखिला दादुला ॥३॥ ऐसी सौरी झाले परीम्या ऐसा नाही देखिला दादुला । एका जनार्दनींनमिले पायी ऐसा नाही देखिला दादुला ॥४॥
