वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 177. शंखीण डंखीण ३७५८ते ३७५९

शंखीण डंखीण ३७५८ते ३

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084229 · अभंग क्र. ३७५८

3758.
शंखीण डंखीण ३७५८ते ३७५९

बाहात्तर कोटी कात्यायनी । त्यांतया शंखिणी डंखिणी । तृष्णा वासना पापिणी । जन्मो जन्मी गोविती ॥१॥ मोही कुंकुम कपाळीलावून । विशाल स्वरूप अवगुण लोकांलागीभय दावून । भाविक जन भेडसावी ॥२॥ तृषासनविशाळ । जग मोहियेलें अनुमाळ । घालुनियांमायाजाळ । जग थईथई नाचवी ॥३॥ जग पडलेंभ्रांतींत । विसरले आपुले स्वहित । यांत आहेआपुला घात । हे तो कदा न समजती ॥४॥ वरबेगडाचा रंगा । काय भुललासी जगा । होयगुरुपदीं जागा । याच लागी प्रवृत्ती ॥५॥ एकनाथाचेंविंदान । एकाजनार्दनी जोडे ज्ञान । त्यागूनी गुणअपमान चरणी ध्यान लाविले ॥६॥

3759.
हाट करुनी घरासी आणली बसलीवसरीच्या काठी रे । घरची बाईल बाहेर निघालीवसवसुनलागेपाठीरे ॥१॥ शंखीण बाबा डंखीण । त्या घरी शंखीण बाबा डंखीण रे ॥धृ.॥ चौशेरांचावरण भात केला वर भाजीचा गोळा रे । मोठ मोठेघास घेती भुरळ फिरवी डोळा रे ॥२॥ आठ भाकरीबारापोळ्या धिरडीखादली सोळारे पाणी पिऊनीढेकर दिला मराठी तिचा मोळा रे ॥३॥ बारा सोळालुंगडी नेसली येईना पाठी पोटी रे । नव खणाचीचोळी शिवली उराशी येईना गांठी रे ॥४॥ एकाजनार्दनीं म्हणे बाबा ऐशी बाईल केली रे । तिच्याभयाने सर्व दैवते पळुनियां गेली रे ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग