(गौळणींची अवस्था)
3775.
(गौळणींची अवस्था)
मै भुली घरजानी बाट । गोरस बेचन आये हाट ॥१॥
कान्हा रे मनमोहन लाल । सब ही बिसरू देखे गोपाल ॥धृपद॥
काहा पग डारू देखे आनेरा । देखे तो सब वोहिन घेरा ॥२॥
हु तो थकित भईरे तुका । भागा रे सब मनका धोका ॥३॥
अर्थ :
गोरस विकण्यासाठी एक गवळण बाजारहटात आली व ती म्हणते की मी आता घरी जाण्याचा मार्गच विसरुन गेली आहे. त्या बाजारहाटात मला गोपाल दिसला आणि मग काय मी सर्वकाही विसरुन त्याचेच नांव घेऊ लागले त्याला म्हणू लागले हे कान्हा मनमोहना नंदलाला. मी माझा पाय कोठे ठेवू हे मला काही कळेना कारण जिकडे पाहावे तिकडे मला तूच दिसू लागला सर्व जागा त्यानेच व्यापून टाकलेली मला दिसत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, पुढे ती गोपी म्हणते हे पाहून मी आश्चर्यचकित झाले आणि माझ्या मनातील संसाराविषयी असणारे सर्व भयच नाहीसे झाले.
