आणीके काय थोडी । परि
3767.
आणीके काय थोडी । परि ते फार खोटी कुडी ॥१॥
सदा मोकळीच गुरे । होती फजीत ती पोरे ॥धृपद॥
सदा घालिती हुंबरी । एक एकाचे न करी ॥२॥
तुका म्हणे घरी । माय वेळोवेळा मारी ॥३॥
अर्थ :
जगामध्ये गोपाळाची मुले थोडी आहेत काय परंतू ती फार वाईट आणि वाईट वृत्तीचे आहेत. त्या गोपाळांच्या पोरांची इंद्रियरुपी गुरे नेहमी मोकळीच असतात त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे बंधन नसतात त्यामुळे त्या पोरांची नेहमी फजितीच होते. नेहमी ती पोरे एकमेकांशी भांडत असतात कधीही कोणाचे काहीच ती पोरे ऐकत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, या पोरांच्या घरी त्यांची आई त्यांना नेहमी मारत असते म्हणजेच मायेमुळे यांना अनेकवेळा फजित व्हावे लागते.
