चोपदार ३७४९ ते ३७५०
3749.
चोपदार ३७४९ ते ३७५०
चोपदार आला चोपदार आला ॥धृ.॥ माझे चोपदाराचें रहाणे । आकाश स्वर्ग पहाणे ।
चतुर्मुख चकीत होऊन । निराकारीची वस्ती दिधलीविष्णुनें ॥१॥ शंख चक्र गदा घेऊन । महादेवी शून्य द्वारपाळ जाण । कळीकाळा टाकीन छेदुन । रंडीचंडी शक्ति टाकीन भेदुन । चोपदार आहे मी जाण॥२॥ आम्हांस नाही उपाय । आम्हांसं नाही बापना माय । खरीचाकरी कोठे करावी । एका जनार्दनीदृढ धरावी ॥३॥
