वासुकी सर्प मोठा दार
3788.
वासुकी सर्प मोठा दारुण । क्रोधेबैसला बिळी जाऊन । सहज मी तेथे केले गमन । तमोगुणें घातले सारवण । तेथून नष्ट आला धावून । त्याने मजवर झडप घातली जाण ॥१॥ सापचावला । अगागागा । अबाबाबा । अताताता । अरेरेरे । साप चावला ॥२॥ याची जात मोठी कठिण । मायाभुली पडला येऊन । माझे जडावलें मन॥गरगर गिरकी आली दारुण । साप चावला ॥३॥ या गिरकीचें नाही भय । मी केले सहस्र अन्याय । तोचि दडपिला हा पाय । आता कोण वांचवीलठाव । साप चावला ॥४॥ माझा देवावर हवाला । सत्य गुरु दत्त दाता । तारक मंत्र तुज देई । तोचतला सोडवील । यम करील काई । पावशीलचिंतामणी । एका जनार्दनी पायी ॥५॥
