(गौळणींची अवस्था)
3788.
(गौळणींची अवस्था)
एकली राना गोविंदा सवे । गेले ठावे ते झाले ॥१॥
मज न म्हणा न म्हणा शिंदळी । नाही विषम जवळी आतळले ॥धृपद॥
नव्हती देखिली म्या वाट । म्हणोनि हा धीट संग केला ॥२॥
सलगी धरी पयोधर । साहाती करमुर सवे ॥३॥
भेणे मिठी दिधली गळा । सेजे जवळा दडाले ॥४॥
आहेव मी गर्भीन पणे । हे सांगणे का लागे ॥५॥
तुका म्हणे शेवटा नेले । संपादिले उभयंता ॥६॥
अर्थ :
एक गोपी म्हणते मी एकटी गोविंदा सोबत रानामध्ये गेले हे तुम्हा सगळ्यांना समजलेच. त्यामुळे मला तुम्ही मी व्याभिचारी आहे असे म्हणू नका म्हणू नका कारण मी विषमतेला पोहोचले आहे आणि त्याच्याशी माझे संघटना देखील झालेले नाही. मला रानातील ( संसार )वाट देखील माहित नव्हती आणि मी ती वाट पाहिली देखील नव्हती त्यामुळे तर मी निर्भय अशा गोविंदाच्या संगतीत या रानात गेले. त्याने प्रीतीने माझे चित्त रुपी पयोधर धरले असे करू नको अशी कुरकुर करीत सहन केले मग तुम्हीच सांगा की माझ्याकडून चुकीचे काय घडले ते. मी गोविंदाला मिठी मारली कारण या रानातील श्वाप दे म्हणजे कामक्रोध रुपी श्वावपदे यांच्यापासून मला भीती वाटत होती या कारणामुळेच मी त्याच्या सुखाच्या शेजारी जवळ जाऊन लपून बसले आहे. आता तुम्ही मला विचारल की तू गरोदर कशी राहिली आहे ते तर मला तुम्हाला हे सांगावा लागेल की काय की मी विवाहित आहे व मला नवरा देखील आहे. तुकाराम महाराज म्हणतात अशाप्रकारे त्या गोपी केने कृष्णाचे व स्वतःचे लौकिक सांभाळला व आपला परमार्थ शेवटास नेला.
