वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

देखिलासि माती खातां

🙏 3. संत तुकाराम · ABH-079482 · अभंग क्र. ३७४७

3747.
देखिलासि माती खातां । दावियाने बांधी माता ॥१॥
जाळी घेउनि कांबळी काठी । गाई वळी वेणु पाठी ॥२॥
मोठें भावार्थाचें बळ । देव जाला त्याचे बाळ ॥३॥
तुका म्हणे भक्तांसाठीं। देव धांवे पाठोपाठी ॥४॥

अर्थ :
यशोदे ने कान्हाला माती खाताना पाहिले आणि म्हणून त्याला त्या मातेने दाव्याला बांधून ठेवले. कांबळं अन् काठी घेऊन कान्हा गाई राखत असे अन् वेणू वाजवत त्यांना परत घरी घेऊन येत असे. भक्तीभावाचे बळ इतके मोठे असते की प्रत्यक्ष देव स्वतः यशोदेचे बाळ बनून तिच्याकडे राहू लागला. तुकोबा म्हणतात, भक्तांसाठी देव त्यांच्यामागे धावत असतो.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग