वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

वरता वेंघोनि घातली उ

🙏 3. संत तुकाराम · ABH-079820 · अभंग क्र. ३७६१

3761.
वरता वेंघोनि घातली उडी । कळंबा बुडी यमुनेसी ॥१॥
हरी बुडाला बोंब घाला । घरची त्याला ठावा नाही ॥धृपद॥
भवनदीचा न कळे पार । काळिया माजी थोर विखार ॥२॥
तुका म्हणे काय वाउग्या हाका । हातींचा गमावुनि थिंका ॥३॥

अर्थ :
यमुना तीरी असलेल्या कदंब वृक्षावर श्रीकृष्ण चढला व तेथून त्याने यमुनेत उडी मारली. 'श्री हरी बुडाला' अशी तेव्हा चहुकडे ओरड झाली. त्याच्या घरच्या लोकांना तर कोणालाच काळाले नाही. यमुने च्या पात्रात विषारी कालिया आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हाती असलेला हरी सोडता आणि आता उगाच हाका मारता आणि का रडत बसता ?

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग