वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 180. सौरी ३७६२ ते ३७७०

सौरी ३७६२ ते ३७७०

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085619 · अभंग क्र. ३७६२

3762.
सौरी ३७६२ ते ३७७०

हुली गाय हुली शिंगे वासरूंजालें कोसें । प्रकृती पुरुषा भांडण जाले खाटलें जाले वोसें ॥१॥ चाल रामराया । लागे तुझ्या पाया ॥धृ.॥ आनकाई वरिष्ठकाई त्यावरी बैसला खुभा । मिसकिन मामी फुसकुन पादली जावई हागे उभा॥श नाही नर नाही नारी नाही तेथेयोनी । हुसकुनगेले सावले । तेथे परतले दोन्ही ॥३॥ वेणी फणीकाजळ कुंकु केला टाकमटीका । पाठिची बाईलप्रकृति भली संसार करी निका ॥४॥ चांग भांगकरुनी गेली केतकी बना । सोळाजणे लेकरे जालीदादुला नये मना ॥५॥ कार्यास्तव सौरी चाले डौरउजवे करी । मातापुरी यात्रा भरली उदो रेणागिरी॥६।जाती वर्ण कुळधर्मनुरेची आम्हा काही । एकाजनार्दनीं शरण तनु मन तयापायीं ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग