वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(गौळणींची अवस्था)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079746 · अभंग क्र. ३७८२

3782.
(गौळणींची अवस्था)
घाली कवाड टळली वाड राती । कामे व्यापिली का पडिली दुश्चित्ती ।
कोणे लागला गे सदैवेचे हाती । आजि शून्य शेजे नाही दिसे पती वो ॥१॥
बोले दूतिकेशी राधा हे वचन । मशी लाघव दाखवी नारायण ।
म्हणे कोमळ परी बहु गे निर्गुण । याशी न बोले कळला मज पूर्ण वो ॥धृपद॥
धाडिले गरुडा आणिले हनुमंता । तै पाचारिले होउनि ये वो सीता ।
लाजिन्नली रूप न ये पालटिता । झाला भीमकी आपण राम सीता वो ॥२॥
सत्यभामा दान करी नारदासी । तै कळला वो मज हृषीकेशी ।
तुळे घालिता वो न ये कनक रासी । सम तुके एक पान तुळसी वो ॥३॥
मज भुली पडली कैशा परी । आम्हा भोगूनि म्हणे मी ब्रम्हचारी ।
दिली वाट यमुने माये खरी । तुम्हा आम्हा न कळे अद्यापवरी वो ॥४॥
जाणे जीवीचे सकळ नारायण । असे व्यापूनि तो न दिसे लपून ।
राधा संबोखिली प्रीती आळिंगून । तुका म्हणे येथे भावचि कारण वो ॥५॥

अर्थ :
एक दिवस श्रीकृष्ण येण्यास खूप उशीर झाला खूप रात्र झाली होती त्यामुळे राधेने कवाड लावून घेतले व उगाचच सेजेवर पडली परंतू तिचे मन कामनेने व्यापले होते. ती म्हणाली आज हा श्रीकृष्ण कोणत्या भाग्यवान गोपीकेच्या हाती लागला असेल काय माहित आज माझी सेज देखील शून्य दिसत आहे माझा पतीही मला येथे दिसत नाही. असे वचन राधा आपल्या दासीशी बोलत होती ती तिला म्हणत होती की हा नारायण नेहमी मला अशाच प्रकारचे खोटेच काहीतरी दाखवून माझ्याशी कपट करुन मला फसवत असतो. राधा पुढे म्हणते हा दिसण्यास खूप कोमल आहे परंतू आतून खूप निर्गुण आहे आता मी याच्याशी बोलणारच नाही हा कसा आहे ते मला आता पूर्णपणे कळले आहे. एकदा या श्रीकृष्णाने गरुडाला आ

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग