भ्याली जिवा चुकली दे
3763.
भ्याली जिवा चुकली देवा । नाही ठावा जवळी तो ॥१॥
आहाकटा करिती हाय । हात डोके पिटिती पाय ॥धृपद॥
जवळी होता न कळे आम्हा । गेल्या सीमा नाही दुःखा ॥२॥
तुका म्हणे हा लाघवी मोठा । पाहे खोटा खरा भाव ॥३॥
अर्थ :
गोपाळ स्वतःच्या जीवाला घाबरले आणि त्यामुळे ते भगवंताला मोकलले. वास्तविक तो त्यांच्या जवळच, त्यांच्या अंतकरणात होता; परंतु त्यांना ते ठाऊक नव्हते. ते सर्वजन 'आहा' 'हाय-हाय' करू लागले. आपापले हात-पाय डोके पिटून घेऊ लागले. देव जवळ होता, पण तो आम्हाला काळाला नाही. तो गेल्यावर आता आमच्या दुःखला पारावार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देव मोठा लाघवि आहे. प्रत्येकाच्या मनातला खरा-खोटा भाव तो ओळखतो.
