वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(गौळणींची अवस्था)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079882 · अभंग क्र. ३७९२

3792.
(गौळणींची अवस्था)
विरहतापे फुंदे छंद करिते जाती । हा गे तो गे सावधान सवेंचि दुश्चिती ।
न सांभाळुनि अंग लोटी पाहे भोवती । वेगळीच पडो पाहे कुळाहुनि याती वो ॥१॥
खुंटलीसी झाली येथे अवघियांची गती । आपुली परावे कोण नेणे भोवती ।
त्यांच्या नावे बोभे बोभे हा हो श्रीपती । नवलाव हा येरा वाटोनिया हांसती ॥धृपद॥
बाहेरीच धावे राना न धरीच घर । न कळे बंधना झाला तेणे संचार ।
विसरूनि गेली सासुरे की माहेर । एका अवलोकी एका पडिला विसर ॥२॥
तुका म्हणे तुम्ही अवघ्या राहा निश्चळा । नये आता येऊ येथे सर्वथा बळा ।
त्याचा त्याच्या मुखे अवघायांची निर्वाळा । बहुता मते येथे तर्कवाद निराळा वो ॥३॥

अर्थ :
एक गवळण हरीच्या विरहामध्ये स्फुंदत होती त्याच्या छंदात ती माघारी जात होती आणि रस्त्याने कुणी दिसले की, हा बघा माझा हरी, तो बघा माझा हरी असे ती म्हणत होती आणि लगेच सावधान होत होती व हरी दिसला नाही की ती पुन्हा उदास होत होती. आणि तिची अशी अवस्था झाल्यामुळे ती स्वत:चे अंगही ति सांभाळू शकत नव्हती अंग जमिनीवर टाकून देत होती व तिच्या अशा वागण्यामुळे कुळाहून, तिच्या जातीहून ती वेगळी होऊ पहात होती. तिला आपले कोण, परके कोण हे काहीच कळत नव्हते तिला भानावर आणण्यासाठी सर्व आप्टेष्टांची बुध्दी खुंटली होती. ती श्रीपतीच्या नावाने बोभाटा करत होती त्याच्याच नावाने ओरडत होती इतरांना हा प्रकार पाहून हसू येत होते. ती गवळण बाहेर रानावनात धावत होती, घरात थांबतच नव्हती तिला बंधन वगैरे काहीच कळत नव्हते कारण तिच्या अंतरंगात कृष्णाचा संचार झाला होता. ती सासर आणि माहेर यांना विसरुन गेल

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग