कोल्हाटीण ३७५१ ते ३७
3751.
कोल्हाटीण ३७५१ ते ३७५२
आनंदी सद्गुरु पूर्ण परात्पर अभेदनमियेला । कायावाचामनें शरण गेलो मी त्याला । मूळचा सर्व ठाव तेणे मज दाखविला ज्ञानांजनघालूनि प्रवृत्ति मार्ग खुंटविला । पूर्ण बोध । पाठविला ॥१॥ कोल्हाटीण झाले बाई मीकोल्हाटीण झाले ॥धृ.॥ प्रवृत्तीचे वस्त्र फेडुनीसुखा सुखी रिझलें । परात्पर पर पुरुष पाहूनित्यापाशी मी गेले । अंग संगती करून त्याचे सुखम्यां हरविलें । अधरामृत म्या सेविले । कोल्हाटीणझालें ॥२॥ आशा मनशा तृष्णा ह्या तिन्ही मेळविल्यारांडा । भाव चोहटा वेळू तेथे लावियेला झेंडा । करून उलट प्राणाचा क्रोध तो मारिला मेंढा । ब्रह्मरंध्रीं मिसळलें आला अमृत लोंढा । मग तोअहंकार मेंगा त्यांनी या भुलविलेंसोंगा॥को० ॥३॥ मागे सारून कामे मारिली उफराटी उडी । भ्रांतिलुगडे फिटुनि गेले काया झाली उघडी । पूर्णअनुभव कळुनी त्यासी मांडिली फुगडी । मदनमोहना दादुला घेउन झाले ते हिजडी॥को० ॥४॥ परद्वार म्या केले जन्मसार्थक झाले । पंचवीसदादुले हाती धरुनी उठविले । अंतरगृह सावलीतयेऊनि निश्चळ बसलें । एका जनार्दनी एकी एकपणमुरालें । जन्मजरामरण हरलें॥को० ॥५॥
