(गौळणींची अवस्था)
3772.
(गौळणींची अवस्था)
आजि का वो तू दिससी दुश्चिती । म्हणीये काम न लगे तुझ्या चित्ती ।
दिले ठेवू ते विसरसी हाती । नेणो काय बैसला हरी चित्ती वो ॥१॥
सर सर परती झालीस आता भांड । कैसे दाखविसी जगासी या तोंड ।
व्याली माय ते लाजविली रांड । नाही थार दो ठायी झाला खंड वो ॥धृ॥
होते तैसे उमटले वरी । बाह्य संपादनी अंतरीची चोरी ।
नाही मर्यादा निःसंग बावरी । मन हे गोविंदी देह काम करी वो ॥२॥
नाही करीत उत्तर कोणा सवे । पराधीन भोजन दिले खावे ।
नाही अचल सावरावा ठावे । देखो उदासीन तुझे गे देह भाव वो ॥३॥
कोठे नेणो हा फावला एकांत । सदा किलकील भोवती बहुत ।
दोघे एकवत बोलावया मात । नाही लाज धरिली दिला हात वो ॥४॥
करी कवतुक खेळ खेळे कान्हा । दावी लाघव भांडवी सासू सुना ।
पराभक्ती हे शुध्द तुम्ही जाणा । तुका म्हणे ऐसे कळो यावे या जना वो ॥५॥
अर्थ :
सासू सुनेला म्हणते आज तू अशी दु:श्चित का दिसत आहे उदास का दिसत आहे तुला काहीही काम सांगितले तरी तुझे चित्त त्या कामावर मला असलेले दिसत नाही. अग तुझ्या हातात काही दिले की तू ती वस्तू जिथे ठेवायची तिथे ठेवत नाहीये म्हणजे तुझ्या चित्तामध्ये तो हरी तर बसलेला नाही ना ? हे भांड स्त्री चल तू आता माझ्यापासून दूर हो दूर हो आता तुझे काळे तोंड जगाला काय दाखवतेस ? अग तू तुझ्या अशा कर्माने जन्म दिलेल्या आईला देखील लाजेने मान खाली घालावयास लावली या कर्मामुळे तू आता तुझ्या माहेरी आणि सासरी दोन्हीही ठिकाणी उरली नाहीस तुला दोन्ही ठिकाणी थारा राहिलेला नाही. तुझ्या अंत:करणामध्ये जे काही होते ते आता वर प्रकट झाले आहे. बाह्यरुपाने तू जरी चांगल्या वागण्याचे
