(गौळणींची अवस्था)
3789.
(गौळणींची अवस्था)
गोरस घेउनी साते निघाल्या गौळणी । तव ती कृष्णाची करणी काय करी तेथे ।
झाला पानसरा मिठी घातली पदरा । आधी दान माझे सारा मग चाला पंथे ॥१॥
सर जाऊ दे रे सर जाऊ दे रे सर जाऊ दे परता । मुळी भेटलासी आता ।
नाट लागले संचिता । खेपा खुंटलिया ॥धृपद॥
आसुडी पदरा धरी आणीक दुसरा । येरी झोंबतील करा काय वेडा होसी ।
आलो गेलो बहु वेळा नेणो गोरा की सांवळा । सर परता गोवळा काय बोलतोसी ॥२॥
आम्ही येथे अधिकारी मागे केली तुम्ही चोरी । आता कळिलियावरी मागे केले त्याचे ।
बोलिल्या हांसुनी आम्ही सासुरवासिनी । का रे झोंबसी दुरूनी करी मात काही ॥३॥
वाया परनारी कैशा धरिसी पदरी । तया कळलिया उरी तुज मज नाही ।
जडला जिव्हारी फांको नेदी तया नारी । जेथे वर्म ते धरी जाऊ पाहे तियेचे ॥४॥
तया हाती सांपडल्या हाटी पाटी चुकाविल्या । कृष्णमळिणी मिळाल्या त्याही न फिरती ।
तुका म्हणे खंती वाया न धरावी चित्ती । होते तुमच्या संचिती वोढवले आजि ॥५॥
अर्थ :
गोरस घेऊन काही गवळणी बाजारात निघाल्या. त्यावेळची कृष्णाची करणी पाहा त्यावेळी तो तेथे काय करीत होता तर, तो तेथे पानसरा म्हणजे जकातदार झाला आणि गवळणींच्या पदरांना धरुन म्हणू लागला, आधी माझे दान मला दया मग तुम्ही वाटेने चाला. त्या गवळणी कृष्णाला म्हणाल्या हे कृष्णा चल वाटेतून बाजूला हो आम्हाला येथून तू जाऊन दयावेस. कृष्णा चल बाजूला हो तू सकाळी सकाळीच आम्हाला भेटला आहेस. कृष्णा तू आम्हाला भेटल्यामुळे आमच्या संचितकर्माला नाट लागले व आमच्या जन्ममरणाच्या खेपाच आता खुंटल्या. एका गवळणीने आपला पदर हिस
