(गौळणींची अवस्था)
3771.
(गौळणींची अवस्था)
स्वये सुखाचे झाले अनुभव । एक एकीपाशी सांगतील भाव ।
अवघ्या अवघा हा कैसा नवलाव । सर्वसाक्ष तेथे चि त्याचा जीव वो ॥१॥
आपआपणाशी करिती नवल । परि वादावाद न संडिती बोल ।
एका मेघःशामे जळधर वोल । रसी उतावळि हृदय सखोल वो ॥धृपद॥
एक विषय तो सकळांचा हरी । त्याच्या आवडीने आवडी इतरी ।
अंध बहिर हे प्रेत लोका चारी । त्यांची कीर्ति गाइली पुराणांतरी वो ॥२॥
स्तुति पराविया मुखे रुचिकर । प्रीतिपात्राच्या गौरवी आदर ।
परस्परे हे सादरा सादर । योग सज्जनाच्या सुखा नाही पार वो ॥३॥
भक्तिवल्लभ न तुटे चराचरी । आप्त अनाप्त हे ऐशी ठेवी उरी ।
दुरी जवळी संचिता ऐसे धरी । रंगा रंगा ऐसे होणे लागे हरी वो ॥४॥
तुका लाधला हे उच्छिष्ट भोजन । आला बाहेरी प्रेमे वोसंडून ।
पडिले कानी त्या जीवाचे जतन । धरियेले एकाभावे हृदयी चरण वो ॥५॥
अर्थ :
हरीसुखाचा जो अनुभव गोपीकांना आला तोच अनुभव त्या एकमेकींपाशी सांगत होत्या. हा हरी एकाच वेळेस सर्वांच्या ठिकाणी सर्वांना समाधानी करतो या गोष्टीचे गवळणींना आश्चर्य वाटत होते आणि सर्व साक्षी असलेल्या हरीच्या ठिकाणीच गवळणींचा जीव होता. गवळणी एकमेकींशी या गोष्टीविषयी नवल व्यक्त करत होत्या परंतू हरीच्या वर्णनाविषयी एकमेकांशी वादविवाद करण्याचे ते काही सोडत नव्हत्या. एका मेघश्याम वर्ण असलेल्या श्रीकृष्णाच्या प्रती गवळणींचा अतिशय जिव्हाळा होता त्याचा आनंदरस भोगण्याकरता त्यांचे मन उतावीळ झाले होते व त्यांनी मन गंभीर केले होते. एका हरीच्याविषयीच सर्व गवळणींना आवड होती आणि त्याची प्राप्ती होईल अशी सर्व साधने देखील
