वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 194. विंचू ३७८९ ते ३७९०

विंचू ३७८९ ते ३७९०

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084038 · अभंग क्र. ३७८९

3789.
विंचू ३७८९ ते ३७९०

सहजीं सहज स्वये स्थिती । स्वभावें॥भावना आर्तक आली स्थिती । अलक्ष लक्षणामां विकार उत्पत्ती । हा हा मज विंचवे खादलें॥अवचितीं ॥१॥ अहं विंचवे खादले करू काय॥किती मीपणा ब्रह्मांडी भरला माय । अष्टांगीये चढला तेणे तळमळी होय । कर्मभोग आदळितो । हातपाय ॥२॥ जीव शिवाचिये संधीमाजीं होता । i तो मज झोंबता मी काय करू आता । धरी मारी । तंव रिघाला आतवता । कांही केलिया वो नुतरे । सर्वथा ॥३॥ अतिचिंतेच्या थोर येताती तिडका॥वित्तहानीच्या वेगी उठती भडका । द्वंद्वबाधेचा न । साहे धडका । विषयविलोभाच्या आदळती थडका ॥४॥ बहुमान ते थोर तळमळ । कामिनीकामाची नित्यजळजळ । पुत्रलोभाचे लागती इंगळ । लोकलाजेचीअंगी लागे कळ ॥५॥ नित्यनिंदेची खरस येततोंडा । कर्मस्वेदाचा सर्वांगी चाले लोंढा । त्याचाउतारु नव्हे नव्हे उदंडा । जेथे झोंबला ते नेती जेनिधाना । माझी मज न साहे उदरवेदना । वेगींपाचारा निजगुणी जनार्दना । त्याचे नामे निरसेव्यथा नाना ॥७॥ ऐसिये अनुतापे तापली अनुदिन । भाव सद्गुरुजी पातला आपण । अनन्यगतीं धरितांतयाचे चरण । तेणे हस्तक मस्तकी रक्षा केलीपूर्ण ॥८॥ भावे लागता गे मज त्याचिया पाया । त्याने कळ सोडोनी मोकळी केली काया । ब्रह्माहमस्मि विंचु आणिला गे ठायां । थोर तळमळमाझी गेली विलया ॥९॥ विंचु उतरतां मीपणामाजीठक । तेणे सहित उतरिले विषय विख । बंधमोक्ष । अहं सोहं सुखःदुख । वेदने सहित उतरविलें । देख ॥१०॥ एका जनार्दनी आलागे निजगुणी । विष उतरुनी तेणे केले अगुणी । स्वानंद कोंदला । आनंद गिळुनी । देहविदेह गेले विसरुनी ॥११॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग