धाव कान्होबा गेल्या
3766.
धाव कान्होबा गेल्या गाई । न म्हणे मी कोण काई ॥१॥
आपुलियांचे वचन देवा । गोड सेवा करीतसे ॥धृपद॥
मागता आधी द्यावा डाव । बळिया मी तो नाही भाव ॥२॥
तुका म्हणे ऐशा सवे । अनुसरावे जीवेंभावे ॥३॥
अर्थ :
कान्होबा, अरे, गाई दूर गेल्या. धाव (असे गोपाळ त्याला म्हणतात) मी कोण आहे? असली हलकी कामे मला का सांगता ? असे श्रीकृष्ण कधीच म्हणत नव्हता. देवाला आपल्या खऱ्या भक्ताचे बोलने गोड वाटते. तो त्यांची सेवा करतो. देवा, तू आज अगोदर डाव द्यायला पाहिजे. असे जर सवांगड्यानि म्हंटले तर "मी सामर्थ्यवान आहे" मी का म्हणून आधी डाव देवु? " असा विचार तो कधीच करत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, श्रीकृष्ण ज्या गोपाळांचा दास होतो, अश्या भक्त गोपाळांना शरण जावे व त्यांचे अनुकरण करावे, असे मला वाटते.
