कुंटीण ३७५५
3755.
कुंटीण ३७५५
सद्गुरुमाय कुंटीण झाली माझी । व्यभिचारा ठेविले सये आजी ॥धृ.॥ अद्वैताचा मज
पांघरविला शेला । एकांतासी तिने चालविले मला ॥१॥ पर पुरुषाचे शेजेवरी नेउनी घातली । मागल्याची सोय सोडविती झाली॥भ्रांतीपदरकाढुनी ओढीती झाली । अलिंगन द्यावयासरसावली ॥३॥ वासनेचे कंचुक सोडियेलें । मायामय कुच हे मर्दियेले ॥४॥ जीवशीव मिठी घालीधरी आवळुन । करुन ऐक्यतां माझे चुंबील वदन ॥५॥ अलक्ष पदातीत घातले आसन । देहातीतभोगिला भोग त्याने ॥६॥ एका जनार्दनी भोळी नारीपरपुरुष भोगी निरंतरी ॥७॥
