वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 191. टिटवी ३७८५

टिटवी ३७८५

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084764 · अभंग क्र. ३७८५

3785.
टिटवी ३७८५

एक ग्रामावरी जाऊन । एक नदीतीरपाहून । तेथे टिटवी करी शयन । दोन्ही पायांतखडा धरून गा ॥१॥ टिटवी यमाची तराळीण । टिटाव टिटाव टिटाव । तीड तीड तीडजाणगा ॥धृ.॥ मरेल चौगुल्याची सून । पाटलाचेचौघेजण । कुळकाची लाडकी सून । आतांगांवांत राहिले कोण गा ॥२॥ देशमुख देशपांडेचौधरी जाण । शेटे महाजन नेईन । चौगुल्याचेजवळ मरण । आता गांवात नाही कोण गा ॥३॥ ।नाईक वाड्यासी धरी । शेलकी देशमुखाची पोरी । याची गणना कोण करी । आता गांवात नाहींथोरी गा ॥४॥ आता गांवा वचनें हीन सारा॥केवढा टिटवीचा दरारा । गांवात हिंडतां चुकेल । फेरा । महारामांगांचा तुला आसरा गा ॥५॥ लव्हार । सुतार बलुते बारा । माळी तेली वाण्यास दरारा॥सुनेकरासी दिधला थारा । म्हणोनि हरिभजनकरा गा ॥६॥ आता नाही कोणासी कोण । शेवट मारीन मी नेऊन । माझे संगतीं मांगीण । एका जनार्दनी लहान थोरपण गा ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग