विंचु चावला वृश्चीक
3790.
विंचु चावला वृश्चीक चावला । कामक्रोध विंचु चावला । तम घाम अंगासीआला ॥धृ.॥ पंचप्राण व्याकुळ झाला त्याने माझाप्राण चालिला । सर्वांगाचा दाह झाला ॥१॥ मनुष्यइंगळी अती दारूण । मज नांगा मारीला तीणे । सर्वांगी वेदना जाण । त्या इंगळीची ॥२॥ ह्याविंचवाला उतारा । तमोगुण मागे सारा । सत्वगुणलावा अंगारा । विंचू इंगळी उतरे झरझरा ॥३॥ सत्व उतारा देऊन । अवघा सारिला तमोगुण । किंचित् राहीली फुणफुण । शांत केलीजनार्दने ॥४॥
