वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 192. पोपट ३७८६

पोपट ३७८६

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085214 · अभंग क्र. ३७८६

3786.
पोपट ३७८६

पढो माझ्या आत्मारामा । राधा कृष्णाचेंहे ध्यान । पिंजऱ्यामध्ये गुंतलासीं । तुज सोडवील । कोण ॥धृ.॥ चौऱ्यांशी लक्ष योनी । वनी तू । तरी हिंडसी । प्रमदा विष फळी अति त्वरे धांवघेसी । घेऊनियां दोही पक्षी । पाहती तुज । न्यावयासी ॥१॥ पिंजरा घडविला पंचभूतांचाकुसरी । नव द्वारे सोळा सांधे । प्रभा पडली । भीतरी । लाविली प्राचीनाची दोरी । बांधिलानिज मंदिरी ॥२॥ हिरवा तुझा रंग । गुंज वर्णदोन्ही डोळे । चोंच आहे तुझी लाल । बोल तुझाहा मंजुळ । राघवा तू बोल माझ्या सख्या अमोलिक । बोल ॥३॥ अचळ तू चंचळ मोठा हिंडे तीनहीताळ । तुला जपला काळ । बोका केव्हा घालिल । गळ । जरी जाशी उडोनियां । पूर्व सुकृताचें फळ ॥४॥ सत्य गुरु दत्त दाता । तारक मंत्र तुज देई । तोचतुला सोडवील । यम करील काई । पावशीलचिंतामणी । एका जनार्दनी पायी ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग