वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(गौळणींची अवस्था)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079714 · अभंग क्र. ३७८०

3780.
(गौळणींची अवस्था)
काय उणे का करीतोसी चोरी । किती सांगो तुज नाइकसी हरी ।
परेपरता तू पळोनि जासी दुरी । अनावर या लौकिका बाहेरी वो ॥१॥
माया करुणा हे करिते बहुत । किती सोसू या जनांचे आघात ।
न पुरे अवसरु हेचि नित्यानित्य । तूचि सोडवी करूनि स्थिर चित्त वो ॥धृपद॥
बहुत कामे मी गुंतलिये घरी । जासी डोळा तू चुकावूनि हरी ।
करिता लाग न येसी चपळ भारी । नाही सायासाची उरो दिली उरी वो ॥२॥
तुज म्हणीये मी न संगे अनंता । नको जाऊ या डोळिया परता ।
न लगे जोडी हे तुजविण आता । तुकयास्वामी कान्होबा गुणभरिता वो ॥३॥

अर्थ :
भगवान श्रीकृष्ण गोकुळात चोरी करु लागले त्यावेळी अनेक गवळणी यशोदेकडे तक्रार करु लागल्या त्यावेळी यशोदा कृष्णाला म्हणते अरे कृष्णा आपल्या घरी काय कमी आहे तू चोरी का करतोस हे हरी तुला कितीही सांगितले तरी तू ऐकत नाहीस. अरे कृष्णा तू असा आहेस की परावाणीच्या पलीकडेही जाऊन लपतोस तुला धरताही येत नाही आणि लौकिकामध्ये पाहिले तर तू कोणालाही आवरल्या जात नाहीस. पुढे यशोदा माता कृष्णाला म्हणते अरे कान्हा मी तुझ्यावर इतके प्रेम करते तरी देखील तू बाहेर चोरी करतोस चोरी करु नकोस म्हणून मी तुला किती वेळा करुणा भाकते या गवळणी कितीतरी मला तुझ्या तक्रारी येऊन सांगतात मी किती या जगाचे आघात सोसू. किती आघात सहन करु ? हे कृष्णा मी अरे रोज रोज या तक्रारी ऐकून त्रासले आहे मला आता या गोष्टीचा त्रास होत आहे त्यामुळे तूच आता तुझे चित्त स्थिर कर आणि मला या आघातातून सोडव मी घरामध्ये कामात गुंतलेली असले की हे हरी तू माझी नजर चुकून पळून जातोस. हे हरी तुला पकडण्यासाठी आम्ही तुझा प

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग