वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(गौळणींची अवस्था)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079527 · अभंग क्र. ३७९०

3790.
(गौळणींची अवस्था)
हरी तुझी कांति रे सांवळी । मी रे गोरी चांपेकळी । तुझ्या दर्शने होईन काळी । मग हे वाळी जन मज ॥१॥
उगला राहे न करी चाळा । तुज किती सांगो रे गोवळा । तुझा खडबड कांबळा । अरे नंदबाळा आलगटा ॥धृपद॥
तुझिये अंगी घुरट घाणी । बहु खासी दुध तुप लोणी । घरिचे बाहेरिल आणोनी । मी रे चांदणी सकुमार ॥२॥
मज ते हांसतील जन । धिक्कारिती मज देखोन । अंगींचे तुझे देखोनि लक्षण । मग विटंबणा होईल रे ॥३॥
तुज तव लाज भय शंका नाही । मज तव सज्जन पिशुन व्याही । आणीक मात बोलू काही । कसी भीड नाही तुज माझी ॥४॥
वचन मोडी नेदी हात । कळले न साहे ची मात । तुकयास्वामी गोपीनाथ । जीवन्मुक्त करूनि भोगी ॥५॥

अर्थ :
हे हरी तुझी कांती सावळी आहे तर माझी चाफ्याच्या कळीप्रमाणे गोरी आहे. देवा तुझे दर्शन मला आत्मस्वरुपाने जर झाले तर माझी कांती देखील काळी होईल मग हे संसारीक लोक माझा त्याग करतील. हे गोपाळा तू शांत राहा कोणत्याही प्रकारचे चाळे करु नकोस या गोष्टी तुला किती वेळा सांगाव्यात ? हे नंदलाला नंदाच्या बाळा खोडकरा तुझा कांबळा तर फार खडबडीत आहे. कान्हा तुझ्या अंगाचा खूप घुरट घाण वास येतो कारण तू दुध तूप लोणी खूप खातोस. घरचे बाहेरचे सारखे दुध तूप लोणी खातच असतोस. मी चांदणीसारखी सुकुमार व गोरी आहे जर मी तुझे दर्शन घेतले तर माझ्यादेखील शरीराचा उग्र वास येईल. कान्हा लोक मला हसतील मला पाहूनच माझा धिक्कार करतील. तुझ्या अंगातील सर्व लक्षण माझ्या अंगी जर आले तर लोक तर मला हसतील परंतू माझी फार विटंबना होईल. अरे कृष्णा तुला तर लाज भय शंका काहीच नाही. मला तर चांगले वाईट आप्तइष्ट व्याही सर्व आहेत. अरे

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग