वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

अवघिया दिला गोर । मज

🙏 3. संत तुकाराम · ABH-079352 · अभंग क्र. ३७५०

3750.
अवघिया दिला गोर । मजकरे पाहीना ॥१॥
फुंदे गोपाळ डोळे चोळी । ढुंगा थापली हाणे तोंडा ॥धृपद॥
आवडती थोर मोटे । मी रे पोरटे दैन्यवाणे ॥२॥
तुका म्हणे जाणो भाव । जीविंचा देव बुझावू ॥३॥

अर्थ :
एक बोबडा गोपाळ म्हणतो की सर्वांना हरीने काल्याचा गोड गोड गोळा दिला परंतू तो माझ्याकडे काही पाहीना. असे म्हणत तो डोळे चोळत रडू स्फंदू लागला आणि ढुंगणावर व तोंडावर चापटया मारु लागला. तो म्हणू लागला बरोबर आहे हरीला तर मोठे मोठे मुले आवडतात मी तर दैन्य आहे पोरटा आहे मग तो माझ्याकडे कशासाठी पाहीन. तुकाराम महाराज म्हणतात, त्या बोबडया गोपाळाचे शुध्द अंत:करण पाहून देवाने त्याचा शुध्द भक्तीभाव पाहून देवाने त्याची समजूत काढण्याचे ठरविले.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग