वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 180. सौरी ३७६२ ते ३७७०

सौरी झाले बाई आता कर

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-090399 · अभंग क्र. ३७६५

3765.
सौरी झाले बाई आता करु गत काई । बसवी झालेबाई आता भिन्नभेद नाही ॥१॥ कासरालावुन सासरा मारला दादला टाकुन आले । आत्मलिंग पाहुनिया मदनमस्त झाले ॥२॥ बांधुनबुचडा उघडा माथा विभुतीचा पट्टा । आला गेलाम्हटला नाही धरल्या चारी वाटा ॥३॥ उभी शिंदळघाली गोंधळ हाचि लाभ मोठा । मागे पुढे पाहुं नकावेगीं कामलाटा ॥४॥ लहानथोरम्हटला नाही झालेमी वेडी । एका जर्नादनी बसवी झाले परद्वारगोडी ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग