संन्यासी ३७४८
3748.
संन्यासी ३७४८
अहो तुम्ही संन्यासीजाला । कामक्रोधजवळींचा नाही गेला । व्यर्थ का विनाश केला । सावध होई ॥१॥ संसार व्यर्थ सांडिला । मुलाबाळातुटी पाडिला । नारायण नाही जोडीला । सावधहोई ॥२॥ वर वर शेंडी बोडी । जानवें तोडुनी धोत्रेफाडी । हाती घेऊनी दंड लाकडी । सावध होई ॥३॥ वर वर म्हणसी नारायण । अंतरी विषयावरीध्यान । कासया संन्यास घेऊन । सावध होई ॥४॥ आता एक विचार।धरी तुं संतांचा आधार । एकाजनार्दनी तत्पर । सावध होई ॥५॥
