वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 187. कान्होंबा ३७७८

कान्होंबा ३७७८

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084575 · अभंग क्र. ३७७८

3778.
कान्होंबा ३७७८

पहिले कोठेच नव्हते कांही । चंद्रपर्य तारा नाही । अवघे शून्यच होते पाही । कानोबा ते रे ते रे ते ॥१॥ तेथे एक ढालगजनिर्माण झाली । तिने पहा एवढी ख्याती केली । इंद्रादिकांस म्हणे बाहुली । अमरपुरी तिचीघरकुली॥कानोबा० ॥२॥ ती मूळची कर्णकुमारी । तिचा बाप तो ब्रह्मचारी । तो जन्मला तियेचेउदरीं । ऐसी पाहता नवलपरी॥कानोबा० ॥३॥ तिने बापची दादला केला । कोण वाईट म्हणेया बोला । अवघे तिच्याच बोलणे चाला । तरीकैवल्यसुख तुम्हांला॥कानोबा० ॥४॥ तो तियेसीशिवला नाही । वांझ गर्भिण झाली पाही । व्यालीपांच पंचवीस पोरे तीही । ऐसे तियेचे नवलपाही । कानोबा० ॥५॥ ऐशी व्याली ते सकळसृष्टी । न पडता भ्रताराचे दृष्टी । एका जनार्दनी यागोष्टी । विचारा सद्गुरुच्या मुखी । कानोबा० ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग