वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(गौळणींची अवस्था)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079851 · अभंग क्र. ३७६९

3769.
(गौळणींची अवस्था)
गाईन ते लीळा चरित्र पवाडे । राखिले संवगडे सहित गाई ॥१॥
चोरिले नवनीत बांधविला गळा । जे तुम्ही गोपाळा छंद केले ॥धृपद॥
मोहिल्या गोपिका पावयाच्या छंदे । केली ते गोविंदे क्रीडा गाऊ ॥२॥
मायबापा लाडे दाखविले कौतुक । ते या आणू सुख अंतरासी ॥३॥
निर्दाळिले दुष्ट भक्ता प्रतिपाळी । ऐसा म्हणो बळी आमुचा स्वामी ॥४॥
तुका म्हणे सरशी असो येणे बोधे । जाणोनि संबंधे सर्वकाळ ॥५॥

अर्थ :
मी त्या भगवान श्रीकृष्णाचे चरित्र लीला व पोवाडे गायीन ज्याने आपल्या सवंगडयासहीत काही गोपाळाचे रक्षण केले. हे गोपाळा तुम्ही गोकुळामध्ये जे नवनीत चोरले व ते गळयाला बांधले व अनेकही जे काही छंद केले ते सर्व मी वर्णन करीन. ज्या पावा म्हणजे वेणूच्या नादाने गोपीका मोहित झाल्या आणि जे चरित्र भगवंताने केले व ज्या रासक्रीडा भगवंताने केल्या त्याचे आम्ही पोवाडे गावू. या श्रीकृष्णाने आपल्या मायबापाला नंद यशोदेला जे काही कौतुक दाखविले असेल ते सर्व मी माझ्या ह्दयामध्ये आणून ठेवीन. ज्याने दुष्टांना निर्दाळून भक्तांचा सांभाळ केला अशा बलवान हरीस आम्ही आमचा स्वामी म्हणवून घेऊ. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारे आम्ही देवापुढे या बोधानेच नेहमी राहू आणि हरीशी सर्वकाळ ऐक्यरुपाने संबंध ठेवू.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग