(गौळणींची अवस्था)
3795.
(गौळणींची अवस्था)
धरिला पालव न सोडी माझा येणे । काही करिता या नंदाचिया कान्हे ।
एकली न येते मी ऐसे काय जाणे । कोठे भरले या अवघड राने रे ॥१॥
सोडी पालव जाऊ दे मज हरी । वेळ लागला रे कोपतील घरी ।
सासू दारुण सासरा आहे भारी । तुज मज सांगता नाही उरी रे ॥धृपद॥
सखिया वेशिया होत्या । तुज फावले रे फांकता तयांसी ।
होते अंतर तई सांपडते कैसी । एकाएकी अंगी जडलासी रे ॥२॥
ऐसी भागली हे करिता उत्तर । शक्ति मावळल्या आसुडिता ।
स्वामी तुकयाचा भोगिया चतुर । भोग भोगी त्यांचा राखे लोकाचार वो ॥३॥
अर्थ :
एक गवळण म्हणते या नंदाच्या कान्हाने माझा पदर धरला हा माझा पदर धरील असे मला माहितच नव्हते. मला जर पूर्वीच माहित असते तर मी या अवघड रानामध्ये आलेच नसते मला काय माहित की हे रान इतके अवघड आहे. हे हरी माझा पदर सोड मला जाऊ दे जर मला घरी जाण्यास वेळ लागला तर माझे घरचे माझ्यावर रागावतील. अरे माझे सासू सासरे नवरा हे फार निष्ठूर आहेत त्यांना जर या गोष्टी सांगितल्या तर तुझे आणि माझे काही खरे नाही बरे. अरे कृष्णा इतक्या वेळ माझ्या प्रिय सख्या माझ्याजवळच होत्या आणि त्या काही निमित्याने जिकडे तिकडे गेल्या तर तुला लगेच फावले लगेच येऊन तू माझा पदर धरला आहेस. अरे कान्हा आपल्या दोघामध्ये उपाधीमुळे खूप अंतर पडले होते परंतू एकेकीच तू कसा येऊन माझ्या अंगाशी झटला आहेस बघ. तुकाराम महाराज म्हणतात, ती गवळण बोलता बोलताच दमून गेली कृष्णाच्या हातातून हात सोडून घेता घेताच तीची शक्ती अगदी कमी झाली. महाराज म्हणतात, माझा स्वामी भोग भोगणाऱ्या लोकांमध्ये फार चतुर होता तो गवळणींचा भोगही भोगी
