एडका ३७९४
3794.
एडका ३७९४
एडका मदन तो केवळ पंचानन ॥धृ.॥ धडक मारिली शंकरा । केला ब्रह्मयाचामातेरा । इंद्र चंद्रासी दरारा । लाविलाजेनेंतो केवळपंचानन ॥१॥ धडक मारीली नारदा । केलारावणाचा चेंदा । दुर्योधना मारीली गदा । घेतलाप्राण । तो केवळ पंचानन ॥२॥ भस्मासुर मुकलाप्राणासी । तेचि गती झाली वालीसी । विश्वामित्रासारखा ऋषि । नाडीला जेनें । तो केवळपंचानन ॥३॥ शुक देवानी ध्यान धरोनी । एडकाआणिला आकळोनी । एका जनार्दनाचे चरणी । बांधिला जेणे । तो केवळ पंचानन ॥४॥
