मी भटीण आले रे भटा ।
3754.
मी भटीण आले रे भटा । नकोकरूं रिकाम्या चेष्टा । काय बोलतोसि चावटा । उगीच चेष्टा करू नको ॥१॥ म्या भटणीने तुज. पाळिले । पाळिल्याचे बरेच उपकार फेडिले । माझे मज आणुन दिले । त्यांत तुझे काय गेले रेभटा ॥२॥ मजपासूनि वेद की रे झाले । ते म्यांतुझ्या हाती दिधले । शंकासुराने चोरून नेले । माझ्याच भयाने ते परत आणिले रे भटा ॥३॥ त्याच्याच आधाराने मी बोलत आहे । काय रे- मस्ती तुसी आली आहे । मस्ती तुझी भटा ठाऊकआहे । आपले अंतरी शोधुनी पाहे रे भटा ॥४॥ लहानाचा थोर तुला म्या की रे केला । नवअवताराच्या हाती मला । दहावा कलंकी राहिला । तोही जाइल विलया रे भटा ॥५॥ एका जनार्दनींकारण । भटाचें हरपले मीपण । उगाच गेला मौनधरून । चैतन्यरूप पाहिले रे भटा ॥६॥
