(गौळणींची अवस्था)
3774.
(गौळणींची अवस्था)
आजि नवल मी आले येणे राणे । भेटी अवचिती नंदाचिया कान्हे ।
गोवी सांगती वो सकळ ही जन । होते संचित आणियेले तेणे वो ॥१॥
गेले होउनि न चले आता काही । साद घालिता जवळी दुजे नाही ।
अंगी जडला मग उरले ते काई । आता राखता गुमान भले बाई वो ॥धृपद॥
बहुत कामे मज नाही आराणूक । एक सारिता तो पुढे उभे एक ।
आजि मी टाकोनि आले सकळिक । तव रचिले आणिक कवतुक वो ॥२॥
चिंता करिता हरीली नारायणे । अंगसंगे मिनता दोघेजणे ।
सुखे निर्भर झालिये त्याच्या गुणे । म्हणे तुका खुंटले येणे जाणे वो ॥३॥
अर्थ :
परमार्थरुपी रानामध्ये मी आले तर काय नवल पाहा नंदाचा कान्हा अवचितच मला त्या रानामध्ये भेटला. मला सर्व लोक सांगतच होते की तू त्या रानामध्ये गेली की नंदाचा कान्हा तुला भेटेलच परंतू आता काय करावे माझे संचितच असे की मला त्या संचिताने या परमार्थरुपी रानात आणले आहे. आता झाले ते झाले होऊन गेले येथे आता कोणाचेच काही चालणार नाही. जरी मी कोणाला साद घातली तरी जवळ माझ्या दुसरे कोणीही नाही म्हणजे व्दैतच शिल्लक राहिला नाही अव्दैत स्थिती प्राप्त झाली. आता कृष्ण माझ्या अंगाशी जडला आहे म्हणजे कृष्ण व मी एकरुप झाली आहे आता येथे माझे काय चालणार आहे आणि हे बयांनो ही गोष्ट मी गुह्य ठेवणे हेच चांगले आहे. संसारामध्ये मला खूप कामे होते विश्रांती तर नव्हतीच एक काम झाले की दुसरे काम पुढे उभेच होते. आज मी ते सर्व काम बाजूला सारुन या रानात आले तर कृष्णाने हे असले अनेक प्रकारचे कौतुक पुढे रचलेले होते. तुकाराम महाराज म्हणतात, ती गोपीका लोकनिंदेचा विचार करु लागली तर नारा
