(गौळणींची अवस्था)
3777.
(गौळणींची अवस्था)
भलो नंदाजीको डिकरो । लाज राखीलीन हमारो ॥१॥
आगळ आवो देवजी कान्हा । मै घरछोडी आहे मान्हा ॥धृपद॥
उनसु कलना नव्हे तो भला । खसम अहंकार दादुला ॥२॥
तुका प्रभु परवली हरी । छेपी आहे हु जगाथी न्यारी ॥३॥
अर्थ :
हे नंदाच्या मुला तू खूप चांगला आहेस आता आमची लाजही तूच राख. हे देवा कान्हा तुम्ही थोडे अलीकडे या आम्ही तुमच्या भेटीसाठी घरदार सोडून रानात आलो आहोत. अहो देवा मी इकडे तुमच्या भेटीसाठी आले आहे हे माझ्या अहंकाररुपी नवऱ्याला कळले नाही तरच चांगले कारण तो खूप वाईट आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे हरी तुम्ही तर परम बलवान आहात माझ्या अहंकाररुपी नवरा तुमच्यापुढे काय करणार आहे मीही तुमच्या नीजस्वरुपामध्ये लपून जगापेक्षा वेगळी झाली आहे.
