बळीचे द्वारी आपण वाम
3351.
बळीचे द्वारी आपण वामन झाला । इंद्राच्या कैवारें बळी पाताळीं घातिला ॥१॥
तोचि महाराज उभा विटेवरी । करे धरिले कटी पावले दोन्ही साजिरी ॥२॥
भक्ताचिया काजा विटे उभा राहिला । एका जनार्दनी देव डोळा पाहिला ॥३॥