(व्यभिचारिणी स्त्रीच
3343.
(व्यभिचारिणी स्त्रीचे रूपक)
बहुतांच्या आम्ही न मिळो मतासी । कोणी कैसी कैसी भावनेच्या ॥१॥
विचार करिता वाया जाय काळ । लटिके ते मूळ फजितीचे ॥धृपद॥
तुका म्हणे तुम्ही करा घटापटा । नका जाऊ वाटा आमुचिया ॥२॥
अर्थ :
(महाराजांची बुध्दी कृष्णरुपामध्ये इतकी तल्लीन झाली की ते म्हणतात)येथे अनेक लोक आहेत अनेक लोकांचे अनेक मत आहेत कोणी कोणत्या भावनेने कोणते मत तयार केले आहेत ते त्यांनाच माहिती त्यामुळे आम्ही त्यांच्या मताशी मिळणार नाहीत. त्यांच्या मताचा जर विचार करण्यास गेलो तर व्यर्थ वेळ जाईल आणि फजिती होण्यास त्यांचे व्यर्थ मत हे मुख्य कारण ठरेल. तुकाराम महाराज म्हणतात, हे ज्ञानी बयांनो तुम्ही घट व पट याची नादी लागा परंतू व्यर्थ आमच्या वाटेला काही जाऊ नका.
