वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

आम्हा लडिवाळांचे बोल

🙏 3. संत तुकाराम · ABH-080481 · अभंग क्र. ३३१५

3315.
आम्हा लडिवाळांचे बोल । करा कवतुके नवल ॥१॥
करू स्तुती तरि ते निंदा । तुम्ही जाणा हे गोविंदा ॥धृपद॥
बोबड्या उत्तरी । तुह्मा रंजवितो हरी ॥२॥
मागतो भातुके । तुका म्हणे कवतुके ॥३॥

अर्थ :
देवा आम्ही तुझे लाडके भक्त आहोत त्यामुळे आम्ही कसे बोलतो याचे नवल करा त्याचे कौतुक करा. हे गोविंदा आम्ही तुझी स्तुती करण्यास जातो परंतू चुकून तुझी निंदा आमच्याकडून घडते परंतू आमचा खरा भक्तीभाव हा तर तुम्ही जाणता आहात. हे हरी मी कसेतरी बोबडे बोल बोलून तुमची करमणूक करीत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा आम्ही कौतुकाने व लाडाने तुला प्रेमरुपी खाऊ मागत आहोत.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग