मृगजळा काय करावा उता
3338.
मृगजळा काय करावा उतार । पावावया पार पैल थडी ॥१॥
खापराचे होन खेळती लेंकुरे । काय त्या वेव्हारे लाभ हाणि ॥धृपद॥
मंगळदायक करिती कुमारी । काय त्यांची खरी सोयरीक ॥२॥
स्वप्नींचे जे सुखदुःख जाले काही । जागृती तो नाही साच भाव ॥३॥
सारी जाली मेली लटिके वचन । बद्ध मुक्त शीण तुका म्हणे ॥४॥
अर्थ :
मृगजलाची नदी पार करण्यासाठी पायउतारा व्हावे लगत नाही. खपरच्या खोट्या पैश्याने मुले खळतात, त्यात खरोखरचा आर्थिक लाभ हानी नसते. लहान मूली बाहुला-बाहुलीचे लग्न करतात; पण त्यात खरे नाते जोडले जात नाहीत. स्वप्नातील सुखदुःखाशी जागृतिमधील जीवनातील काहीही संबंध नसतो. तुकाराम महाराज म्हणतात खेळाच्या पटावरि सोंगट्या मारतात, काही पुन्हा जिवंत होऊन उठतात हे सर्व जसे खोटे असते, तसेच बध्दता, मुक्तता हे शब्द आत्म्याला लागू पडत नाही.
