जालो बळिवंत । होऊनिय
3317.
जालो बळिवंत । होऊनिया शरणागत ॥१॥
केला घरांत रिघावा । ठायी पडियेला ठेवा ॥धृपद॥
हाता चढले धन । ऐसे रचिले कारण ॥२॥
तुका म्हणे मिठी । पायी देउनि केली सुटी ॥३॥
अर्थ :
मी देवाला शरण गेलो त्यामुळे मी बलवान झालो आहे. मी देवाच्या घरात शिरलो आणि देवाचे मुख्य स्वरुप सच्चिदानंद हे आहे ते कोठे आहे याची माहिती करुन घेतली. परमार्थरुपी मुख्य धन हाताला कसे येईल याविषयी मी उपाययोजना केली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मी देवाच्या पायाला मिठी दिली आणि माझी सुटका करुन घेतली.
