भक्त करुणाकर दीनाचा
3327.
भक्त करुणाकर दीनाचा वत्सल । उभा श्रीविठ्ठल विटेवरी ॥१॥
मना जाय तेथे मना जाय तेथे । मना जाय तेथे पंढरीये ॥२॥
पुरतील काम निवारेल गुंती । आहे ती विश्रांति संतसंगे ॥३॥
आषाढी कार्तिकी सोहळा आनंद । मिळालासे वृंद वैष्णवांचा ॥४॥
एका जनार्दनी आनंदी आनंद । तेणे परमानंद डुल्लतसे ॥५॥
