वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

पंडित वैदिक अथवा दशग

🙏 3. संत तुकाराम · ABH-080657 · अभंग क्र. ३३५२

3352.
पंडित वैदिक अथवा दशग्रंथी । परी सरी न पवती तुकयाची ॥१॥
शास्त्रही पुराणे गीता नित्य नेम । वाचिताती वर्म न कळे त्यासी ॥धृपद॥
कर्मअभिमाने वर्ण अभिमाने । नाडले ब्राम्हण कलियुगी ॥२॥
तैसा नव्हे तुका वाणी व्यवसाई । भाव त्याचा पायी विठोबाचे ॥३॥
अमृताची वाणी वरुशला शुध्द । करी त्या अशुद्ध ऐसा कोण ॥४॥
चहु वेदांचे हे केले विवरण । अर्थहि गहन करूनिया ॥५॥
उत्तम मध्यम कनिष्ठ वेगळे । करुनी निराळे ठेविले ते ॥६॥
भक्ति ज्ञान आणि वैराग्य आगळा । ऐसा नाही डोळा देखियेला ॥७॥
जपतप यज्ञ लाजविली दाने । हरीनाम कीर्तने करूनिया ॥८॥
मागे कवीश्वर झाले थोरथोर । नेले कलेवर कोणे सांगा ॥९॥
म्हणे रामेश्वर सकळा पुसोनी । गेला तो विमानी बैसोनिया ॥१०॥

अर्थ :
जगात जरी कोणी पंडित अथवा दशग्रंथी प्रवचन कार झाला असलास तरी त्याची बरोबरी तुकाराम महाराजा बरोबर होणार नाही. त्यांनी जरी शास्त्र, पुराण, गीता हे नित्यनेमाने वाचले तरी त्यातील वर्म त्यांना समजणार नाही. कलियुगा मधील ब्राम्‍हण हे कर्म अभिमानाने व वर्ण अभिमानानेच फसले गेलेले आहेत. तुकाराम हा वाणी आहे व्यवसायिक आहे परंतु तसा नाही त्याचा विठोबाच्या पायी खरा भक्तिभाव आहे. शुद्ध अभंग रुपी वाणीचा सातत्याने वर्षाव केला आहे त्याची वाणी म्हणजे अमृता सारखीच आहे मग त्याला अशुद्ध आहे असे कोण म्हणेल? मनुष्या मधील उत्तम, मध्यम, कनिष्ठ असे देखील वेगवेगळे प्रकार करून हे प्रकार निराळे करून त्यांनी ठेवले आहे. भक्ती ज्ञान आणि वैराग्य यामध्येही तो सर्वांपेक्षा वेगळा आहे निराळा आहे असा सर्वश्रेष्ठ मी माझ्या डोळ्याने कोणीही दुसरा पा

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग