वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 116. मनास उपदेश - अभंग ३२९५ ते ३३४३

अरे अरे मना । सत्य स

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084264 · अभंग क्र. ३३३३

3333.
अरे अरे मना । सत्य सत्य धरी ध्याना । पंढरीचा राणा । वेध ठेवी तयाचा ॥१॥
तुज नाहे रे बंधन । सहज आकळे ब्रह्माज्ञान । वाउगें शोधन । नको करू ग्रंथाचें ॥२॥
मागा तुज शिकविले । परि तू रे नायकशी वहिले । तुझे हितगुज कथिले । शुद्धि करी कांही ते ॥३॥
तू अनिवार सर्वांसी । म्हणोनि कींव भाकितो तुजसी । शरण गुरु जनार्दनासी । एका भावे जाई तू ॥४॥
एका जनार्दनी शरण । जाता होईल समाधान । वाउगें नको भ्रमण । चरणी राहे निवांत ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग