वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

काय करू न करी धंदा ।

🙏 3. संत तुकाराम · ABH-080492 · अभंग क्र. ३३४६

3346.
काय करू न करी धंदा । चित्त गोविंदा तुझे पायी ॥१॥
ऐशा संकल्पाच्या संधी । माझे बुद्धी धीर द्यावा ॥धृपद॥
कुटुंबाचा तुम्हा भार । मज व्यवहार निमित्त ॥२॥
तुका म्हणे करिता काम । हृदयी नाम धरीन ॥३॥

अर्थ :
हे गोविंदा मी कोणत्याही प्रकारचा व्यापार धंदा करत नाही त्याला मी काय करु माझे चित्त तुझ्या पायाशीच रत झाले आहे. असा माझा संकल्प असताना माझ्या बुध्दीला तुम्ही धीर दयावा माझी बुध्दी तुमच्या पायाच्या ठिकाणीच स्थिर राहू दयावा माझ्या बुध्दीला इतरत्र कोठेही जाऊ देऊ नये. खरे तर माझ्या कुटूंबाचा भार तुमच्या माथ्यावर आहे मी केवळ व्यवहाराचा निमित्त आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मी कोणताही व्यवहार करताना कार्य करताना तुझेच नाम ह्दयामध्ये दृढ धरीन आणि त्याचे चिंतन करीन.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग