वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

नाही आम्ही विष्णुदास

🙏 3. संत तुकाराम · ABH-080769 · अभंग क्र. ३३४१

3341.
नाही आम्ही विष्णुदास । करीत आस कोणांची ॥१॥
का हे नष्ट करिती निंदा । नेणो सदा आमुची ॥धृपद॥
असो भलते ठायी मने । समाधाने आपुल्या ॥२॥
तुका म्हणे करू देवा । तुझी सेवा धंदा तो ॥३॥

अर्थ :
आम्ही विष्णूदास आहोत आम्ही कशाचीही अपेक्षा करत नाहीत. असे असून देखील हे दुष्ट लोक आमची नेहमी निंदा का करतात हे काही कळत नाही. आम्ही कोठेही असो कोणत्याही परिस्थितीत असोकग आमचे मन समाधानी असते व आमच्या परिस्थितीशीही आम्ही समाधानी असतो. तुकाराम महाराज म्हणतात, देवा आता आम्हाला कोणी काहीही म्हणो कितीही आमची कोणी निंदा करो परंतू आम्ही तुमच्या सेवेचाच धंदा नेहमी करत राहू.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग